About

About Manjusha Deshpande

Mrs. Manjusha Deshpande is a certified counselor who has done B.com, B.A. (psychology) & M.A. in counselling psychology from Pune University. She has huge and varied experience of counselling to individuals, groups and organization. She is owner of Master mind Coaching & Counselling Centre where she and her team takes care of counselling activities with respect to Marital Issues (Pre – Marital, Married Couple, etc.), Children Psychology (including I.Q. Test, Aptitude Test and career guidance), Old Age, Personality development & Stress Management for working professionals.
Manjusha is also a founder member of non-profitable and non-government organization (NGO) LEAF (Life Empowerment & Awareness Foundation). LEAF is responsible for empowering, educating and inspiring lives of economically backward children, women and families.
She is a certified life skill trainer by which she helps teenagers in rural and municipal schools to understand the importance of various aspects of life to make them self-aware and responsible citizens.
Manjusha is known for her writing skills and literature work through stories, articles & poems which were published and were recognized by renowned local magazines & newspapers.
Her hobbies are doing social work with various groups, attending various seminars, writing and Indian Classical Music.

सौ. मंजुषा देशपांडे ह्या प्रमाणित समुपदेशक (counselor) असून त्यांनी बी.कॉम, बी.ए.(मानसशास्त्र) आणि एम.ए.(समुपदेशन मानसशास्त्र) पुणे विद्यापीठातून केले आहे.त्यांचे मूळगाव मनमाड (नाशिक) असून सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.त्यांना समूह, संस्था आणि वैयक्तिक असा सर्व स्तरासाठी समुपदेशनाचा (counselling) अनुभव आहे. त्यांचे स्वतःचे मास्टर माईंड नावाचे कौन्सेलिंग सेंटर आहे, ज्या अंतर्गत समुपदेशनाच्या माध्यमातून (विवाहपूर्व-वैवाहिक, विद्यार्थांसाठी बुध्यांक चाचणी [I.Q. Test], अभिक्षमता चाचणी [Aptitude test], करिअर मार्गदर्शन, ताणतणाव नियोजन, कौटुंबिक समुपदेशन) सर्व स्तरातील लोकांना मदत केली जाते.

मंजुषा देशपांडे LEAF (Life Empowerment & Awareness Foundation) ह्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या बिगर सरकारी (NGO) संस्थेच्या संस्थापक सदस्य आहेत. LEAF चा मूळ उद्देश आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अविकसित मुले, महिला आणि कुटुंबे ह्यांच्यात सक्षमता आणि जागरुकता निर्माण करून त्यांच्या जगण्याला दिशा देणे हा आहे.

मंजुषा देशपांडे जीवनमूल्ये प्रकल्पाच्या(life Skills Project) प्रमाणित प्रशिक्षक (CertifiedTrainer) आहेत. जीवनमूल्ये प्रकल्पाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलामुलींना जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्ट्य, शिक्षणाचे महत्व आणि स्व-जागरुकता ह्या विषयीची जाणीव करून देऊन एक सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यसाठी मार्गदर्शन केले जाते.

मंजुषा देशपांडे ह्यांच्या घरी वडिलांचे ग्रंथालय असल्याने लहानपणापासून त्यांना वाचनाची गोडी लागली. वाचनाच्या आवडीतूनच त्यांचे लिखाण सुरु झाले. त्या लिहित असलेल्या साहित्यातून त्याचे लिखाणाचे कौशल्य दिसून येते. आजवर त्यांच्या कथा, लेख आणि कविता अनेक मासिकांमधून आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले असून काही साहित्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत. लिखाण आणि वाचन बरोबरच समाजकार्य आणि शास्त्रीय संगीताची आवड आहे.